त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन…

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी अजय विघे|
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विश्वशांती बुद्ध विहार व भीम सरकार ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कु. निकिता सुरेश खंडीझोड सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीरामपूर तसेच रमेश दादा घोडेराव उपाध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तसेच शांताराम रणशूर दि. बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख आदर्श बौध्दाचार्य तसेच ड. भास्करराव गंगावणे कोपरगाव महावितरणचे असिस्टंट इंजिनिअर अतुल खंडारे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सायंकाळी संजयनगर येथून

माता रमाई यांच्या प्रतिमेची कोपरगाव शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वशांती बुद्ध विहार व भीम सरकार ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे तरी कोपरगाव शहरासह तालुक्यातील उपासक उपासिका व बालबालिका यांनी या मि रवणूक सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *