बॉक्स ऑफिसवर तुफान चाललेला 3 इडियट्सचा सिक्वेल येतोय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ फेब्रुवारी । आमीर खानच्या चित्रपटाने देशातील सर्वच इंजिनिअर्सला वेड लावलं होतं. कामयाबी के पिछे मत भाग, काबिल बनो कामयाबी तेरे पिछे भागेगी, असा डायलॉग करत बॉलिवूडच्या रँचोने सर्वांना आवडत्या क्षेत्रात करिअर घडविण्याचा सल्ला दिला. ३ इडियट हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान चालला. आमीर खानसह, शरमन जोशी आणि आर. माधवन यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती. २००९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील तीन दोस्त तब्बल १२ वर्षांनी एकत्र आले आहेत. शरमन जोशीने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात आमीर आणि आर. माधवन हेही दिसून येतात.

https://www.instagram.com/sharmanjoshi/?utm_source=ig_embed&ig_rid=49f0a205-3e47-4e1b-8681-6f3ebbdad083

३ इडियट्स एकत्र आल्याने या चित्रपटाचा सिक्वेल येणार का अशी चर्चा रंगली आहे. मात्र, शरमन जोशीच्या अपकमिंग ‘कॉन्ग्रेच्युलेशन्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे तीन स्टार एकत्र आले होते. क्रिकेट मैदानावरील मॅच ट्रॅकसूटमध्ये तिघेही दिसून येतात. या तिघांना सोबत पाहून चाहत्यांना ३ इडियट्सची आठवण झाली. यावेळी, तिघांनी एकमेकांना हग करत आमीर व आर. माधवनने चित्रपटातील सीनप्रमाणेच शरमन जोशीची मजा घेतली आहे.

शरमन जोशीचा गुजराथी चित्रपट कॉन्ग्रेच्युलेशन्सचे प्रमोशन करण्यासाठी तो एका मैदानात उभे राहून व्हिडिओ बनवत आहे. तितक्यात आर. माधवन येऊन शरमनला जादू की झप्पी देतो. त्यानंतर, काही वेळातच आमीर खानची एंट्री होते. दोघेही मिळून एकच सवाल करतात. त्यावर, माझा कॉन्ग्रेच्युलेशन्स हा चित्रपट येत असून मी त्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, असे जोशी सांगतो. त्यानंतर, हे दोघे शेजारी असताना व्हिडिओ बनवला जाऊ शकत नाही, असे म्हणत तो मैदानात दुसरीकडे निघून जातो, असा हा व्हिडिओ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *