‘‘जगातील कोणतीही शक्ती आम्हाला ….. आदित्य जगताप यांनी दोन ओळींमध्ये चर्चाना दिला पूर्णविराम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।४ फेब्रुवारी । दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप कुटुंबियांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्याचा राजकीय फायदा होईल आणि चिंचवडची पोटनिवडणूक सोपी होईल, असा भ्रम हवेत विरला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीसह जगताप विरोधकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

चिंचवड पोटनिवडणुक उमेदवारीवरून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील कलह विकोपाला गेल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या. त्यातच जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज विकत घेतल्याचे भांडवल करुन जगताप घराण्यामध्ये दोन गट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या चर्चेला जगताप यांचे सुपूत्र दोन ओळींमध्ये पूर्णविराम दिला.

आपल्या पोस्टमध्ये आदित्य याने एकत्र कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात स्वतः आमदार जगताप, त्यांचे दोन्ही भाऊ विजय, शंकर तसेच आश्विनी जगताप, भावजया आणि पुतणे आहेत. आदित्यने त्या फोटोखाली एक पोस्ट लिहीली आहे. त्यात तो म्हणतो, ‘‘जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत.’’`

दरम्यान, निवडणूक बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. पण, देगलूर, कोल्हापूर, नांदेड पोटनिवडणुकीचा वचपा काढायचा आणि चिंचवडमध्ये भाजपचा पाडाव करायचाच या दृष्टीने सर्व विरोधक कामाला लागले . जगताप कुटुंबातच एकवाक्यता नसल्याने आता निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आश्विनी जगताप यांना मोठी सहानुभूती आहे म्हणून त्यांनाच संधी द्यावी, अशी भाजपामध्ये एका गटाची मागणी आहे, तर आगामी महापालिका जिंकायची असेल तर शंकर जगताप यांना उमेदवारी द्या, असा दुसरा मतप्रवाह आहे, असा दावा करण्यात आला. मात्र, जगताप यांचा मुलगा आदित्य याने ‘‘एक घाव दोन तुकडे’’ करुन टाकले आहेत.
**
पोस्ट भावनिक नव्हे, राजकीय प्रगल्भता…
आदित्य जगताप याने ‘‘जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत.’’`अशी फेसबूक पोस्ट केल्यानंतर ही भावनिक पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दिवंगत आमदार जगताप यांच्या मुलाची ही पोस्ट भावनिक नव्हे, तर राजकीय प्रगल्भपणा आहे. आश्विनी जगताप आणि शंकर जगताप असे दोन गट सुरवातीला तयार झाले. मात्र, शंकर जगताप यांनी सर्वांना सोबत घेवून पुढची दिशा ठरवली. याबाबत कुठेही जाहीरपणे वक्तव्य न करता आदित्य जगताप यांने दोन ओळीत विषय क्लोज केला. ही राजकीय प्रगल्भता जगताप कुटुंबियांमध्ये आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये जगताप यांना आव्हान देणे सहज सोपे नाही, असे संदेश आदित्य जगताप याने दिला आहे, असे जगताप जगताप समर्थक सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *