महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी हेमंत रासणे यांच्या नावाची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तर भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पोटनिवडणूक होतेय. याठिकाणी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासून या दोन मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा होत होती. बऱ्याच तर्क-वितर्कांनंतर अखेर आज उमेदवारीची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.