Tata Nano Electric: लवकरच टाटा नॅनो इलेक्ट्रीकमध्ये येणार; पहा किंमत ; रेंज मुंबई-पुण्यापर्यंत…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ फेब्रुवारी । देशात इलेक्ट्रीक कारचे वारे सुरु झाले आहेत. ज्याला त्याला पेट्रोल, डिझेलच्या कार परवडेनाशा झाल्या आहेत. असे असले तरी लोकांकडे सध्यातरी परवडणाऱ्या कारचा पर्याय नाहीय. टाटा ती कमी पुर्ण करण्याच्या विचारात दिसत आहे. लवकरच टाटा नॅनो इलेक्ट्रीक अवतारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येत्या काही महिन्यांत एमजी एअरसोबत टाटा नॅनोचा इलेक्ट्रीक अवतारही भारतीय बाजारात येणार आहे. टाटा नॅनो येत्या काळात जयेम नियो नावाने भारतीय रस्त्यांवर दिसण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या कारची किंमत परवडणारी असेल आणि रेंजही चांगली असण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये, कोईम्बतूरच्या कंपनीने Jayem ने Nano चे इलेक्ट्रिक व्हेरियंट त्याच्या बॅजसह Jayem Neo Electric म्हणून सादर केले होते. या कारसोबत रतन टाटा देखील दिसले होते. 400 युनिट्स कॅब एग्रीगेटर Ola ला देण्याचा निर्णय घेतला गेला होता. जयेम निओ आता सामान्य़ांसाठी देखील उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नॅनो ईव्हीची किंमत ५ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. कारमध्ये 72V बॅटरी पॅक दिसेल, जो पूर्ण चार्ज केल्यावर 200 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅनो इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग, एसी, फ्रंट पॉवर विंडो, ब्लूटूथ, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि रिमोट लॉकिंग सिस्टमसह अनेक विशेष वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. टाटा मोटर्सने जयमचे अधिग्रहण केल्याचेही बोलले जात आहे. या कंपनीला त्याला नॅनो इलेक्ट्रिक प्रकल्पाची जबाबदारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *