कोरोनावर प्रभावी औषध शोधलंय; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ढाका : बांग्लादेशमध्ये सीनियर डॉक्टरांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्या एका मेडिकल टीमने दावा केला आहे की, त्यांना कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या आजारावर उपचार करण्यासाठी एका प्रभावी औषधाचं कॉम्बिनेशन मिळालं आहे. टीमने सांगितलं की, दोन वेगवेगळ्या औषधांना एकत्र करून त्यावर रिसर्च करण्यात आलं, त्यावेळी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला बरं करण्यात या औषधाचा आश्चर्यकारक परिणाम दिसून आला.

बांग्लादेशमधील मेडिकल टीमचा दावा आहे की, अनेक मोठ्या देशांमध्ये या व्हायरसबाबत शोध सुरु आहेत. बांग्लादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (बीएमएचसी) मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर एमडी तारीक आलम यांनी सांगितलं की, 60 रुग्णांवर या औषधाचं परीक्षण करण्यात आलं आहे. या औषधामुळे हे 60 रुग्ण बरेही झाले आहेत. ते म्हणाले की, ‘महत्त्वाचं म्हणजे, या औषधाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नाहीत.’


तारीक आलम यांनी सांगितले की, एक अॅन्टीबायोटिक डॉक्सीसायक्लिन औषधासोबत अॅन्टीप्रोटोजोअल औषध रुग्णांना देण्यात येणार आहे. ज्याचा निकाल उत्तम मिळतो. ते म्हणाले की, माझी टीम फक्त कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी दोन औषधांचा शोध घेत होती. दरम्यान, बांग्लादेशमध्ये आतापर्यंत जवळपास 20,995 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे एकूण 314 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

तारीक आलम पुढे बोलताना म्हणाले की, ‘आम्ही सर्वात आधी रुग्णांची कोरोना टेस्ट करतो आणि जर ते पॉझिटिव्ह आढळून आले, तर त्यांना हे औषध दिलं जातं. ते म्हणाले की, ‘अनेक कोरोना बाधित औषध दिल्यानंतर फक्त 4 दिवसांमध्ये बरे झाले आहेत. डॉक्टर आलम यांनी सांगितले की, आम्हाला 100 टक्के या औषधावर विश्वास आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *