Pune News: लवकरच पुण्यातील रस्त्यांवर डबलडेकर बस धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । हडपसर, कात्रज, कर्वे रस्ता परिसरातील प्रवाशांना पाच ते सहा महिन्यांत डबलडेकर बसमधून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासन शहरातील ४० मार्गांवर इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरु करणार असून मार्गांची निश्चिती झाली आहे.

डबलडेकर बसचे मार्ग निवडताना रस्त्यांची स्थिती तसेच प्रवाशांचा प्रतिसाद या बाबींचा प्रामुख्याने विचार केला आहे. पीएमपीच्या आगामी बैठकीत हा विषय चर्चिला जाईल. त्यांनतर डबलडेकर बसच्या खरेदीला गती येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *