Life Lesson : गौतम बुद्धांच्या ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ; जीवनात खुप फायदा होईल.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरूनी तथागत गौतम बुद्धांचे अनमोल विचार तुमचे जीवन बदलू शकते. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या जीवनातील काही गोष्टी शिकायला पाहिजे.

आपल्या देशांमध्ये असे अनेक महापुरुष झाले आहेत. ज्यांच्या विचारांनी माणूस भरपूर काही शिकू शकतो. या महापुरुषांचे विचार असे असतात. ज्यांना वाचून लोकांना स्वतःच्या आयुष्याचे ध्येय समजते.

या सगळ्या महापुरुषांपैकी गौतम बुद्ध हे एक आहेत. बुद्धांच्या सिद्धांताचे पालन करून तुम्ही तुमची लाईफ व्यवस्थित रित्या जगू शकतात. या सगळ्या गोष्टी धर्मापासून अतिशय लांब. खरंतर प्रगत भगवान गौतम बुद्धांची शिकवण सगळ्यांसाठी एक समान आहे. त्यांच्या गोष्टी तुम्हाला इमानदार, दयाळू आणि मजबूत बनवण्यासाठी मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया गौतम बुद्धांच्या विचारांबद्दल.

1. प्रेम करायला शिका :
रागाला रागापासून नाही तर प्रेमापासून दूर केलं जाऊ शकत. ही गौतम बुद्धांची सर्वात पहिली शिकवण आहे. ही शिकवण आपल्याला बुद्धांच्या जीवनापासून आत्मसात केली पाहिजे. जगामध्ये (World) प्रेम एक अशी भावना आहे जी अत्यंत शक्तिशाली आहे. यामुळे उदासी, राग आणि निराशा दूर होते.

2. शांत राहणे शिका :
अनेक लोक मोठापणा करत असतात. कधी कधी शांत राहणे हे एका बुद्धिमानी व्यक्तीची निशाणी असते. गौतम बुद्धांचे विचार हे शिकवतात की तुमचं बोलणं नाही तर तुमचं काम दर्शवत की तुम्ही कोण आहात. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त ज्ञानाच्या गोष्टी करायला लागलं तर कोणीच तुमचा सन्मान करणार नाही. त्यामुळे शांत राहून आपल्या आसपासच्या गोष्टींवर विचार करणे हे बुद्धिमानी व्यक्तीची लक्षणे (Symptoms) आहेत.

3. विचार करून बोला :
शब्दांमध्ये भरपूर ताकद असते. आपल्या तोंडावर कोणताही शब्द बाहेर निघाला तर तो परत तोंडामध्ये येऊ शकत नाही. चांगले शब्द लोकांना बदलू शकतात. परंतु वाईट शब्द जगाचा विनाश करू शकतात. शब्दांचा आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रभाव पडतो. कोणतीही गोष्ट बोलताना विचार करून बोलावे. जर तुम्ही न विचार करता बोलता तर समोरच्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. जर तुम्ही चांगले शब्द बोलला तर समोरच्या व्यक्तीवर त्याचा चांगला प्रभाव पडतो.

4. स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा :
तुम्हाला तुमची महत्त्वकांक्षा स्वतःहून ठरवायला हवी. बुद्धांच्या विचारांची तुम्हाला ही शिकवण मिळते की, तुमच्या आयुष्याचे लक्ष्य तुम्हीच केंद्रित केले पाहिजे. हे तुमच्यासाठी दुसरे कोणी नाही तर तुम्ही स्वतःच करू शकता.

5. कधीच कोणावर अवलंबून राहू नये :
दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहणे ही व्यक्तीची कमजोर असण्याची पहिली निशाणी आहे. कोणत्याही व्यक्तीने या गोष्टीपासून घाबरले नाही पाहिजे की त्याच्याशिवाय माझं कसं होईल. आयुष्यामध्ये कधीच कोणावर अवलंबून राहू नये. तुम्ही जीवनामध्ये भीती त्या गेली पाहिजे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पकडून बसाल तर आयुष्यामध्ये खूप मागे पडाल. त्यामुळे भीती बाजूला सारून पुढे जायचा प्रयत्न करा कारण की केल्यानं होते पण आधी केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *