महाराष्ट्र २४- ऑनलाईन – बुलढाणा- विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा जिल्ह्यात एकीकडे कोविड19 प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यासाठी जिल्हा,तालुका,ग्रामीण भागातील प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच गत आठवड्यात पाच नवीन कोविड19 बाधित रुग्ण आढळून आले यामुळे आणखी पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार झाले आहेत ग्रीन झोन कडे असलेली जिल्ह्याची वाटचाल पुन्हा जैसे थे या स्थितीत आली आहे बुलढाणा जिल्ह्यात पहिला रुग्ण 29 मार्च रोजी आढळला यानंतर क्रमाक्रमाने रुग्णांचा आकडा 24 वर पोहोचला परिणामी अकरा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याने कोरोना पादुर्भाव नियंत्रणात आला.
पॉझिटिव झालेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव आल्याने त्यांना टप्प्याटप्प्याने सुट्टीची देण्यात आली. 24 पैकी एका रुग्णाचा मृत्यू तर उर्वरित 23 जण या आजारातून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत यामुळे 10 मे रोजी बुलढाणा जिल्हा कोरोनामुक्त होऊन ग्रीन घेऊन कडे वाटचाल सुरू होती.
त्यासोबत सर्व प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्याबाबत प्रशासनाचे नियोजन होतेमात्र जळगाव जामोद येथील एक व्यक्ती बुऱ्हाणपूर ला जाऊन आल्यानंतर 11 मे रोजी करुणा पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा वासियांचा आनंद क्षणभराचा ठरला यानंतर 11 मे ते 17 मे या सात दिवसाच्या कालावधीत एकूण पाच व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये जळगाव जामोद येथील व्यक्ती खामगाव, शेगाव मलकापूर तालुक्यातील नरवेल, व सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे यामुळे जिल्ह्यात पाच प्रतिबंधित क्षेत्राची भर पडली असून ऑरेंज मधील स्थान कायम राहिले आहे .