महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी .के. महाजन – लॉकडाऊन मुळे बंद पडलेले औद्योगिक क्षेत्र पुर्व पदावर आणण्यासाठी येणारया काळात बँकिंग क्षेत्राचे योगदान खुप महत्वाचे ठरणार आहे. 20 लाख करोड च्या पकेज मधील योजना यशस्वी होण्या साठी RBI व सर्व प्रकारच्या बँका व नॉन बँकिंग वित्तीय संस्था यांच्या भुमिकेकडे उद्योजक व व्यापारी वर्ग मोठ्या आशेने बघत आहे. सरकारने मरगळ आलेल्या औद्योगिक क्षेत्राला पुन्हा ऊभारी देण्यासाठी 3 लाख करोड चे आर्थिक पैकेज जाहीर केले आहे. लघू व मद्यम उद्योजकांना खेळते भांडवल तत्काळ मिळावे म्हणून बिना गांरटी कर्ज मिळेल असे जाहीर केले आहे.
त्या मुळे मोठ्या आशेने उद्योजक व व्यापारी वर्ग बँके कडे जाणार आहे. त्या साठी बँकां नी त्या गरजूंना कमीत कमी वेळेत कर्ज देणे आवश्यक आहे. सदर कर्जाचा कालावधी 4 वर्षा चा राहणार असुन त्या कर्जाची परत फेड 1 वर्षानी सुरु होणार आहे जेणे करुन उद्योजक पुर्व पदावर येईल व अर्थव्यवस्था पुर्वी सारखी सुरळीत होइल……
लॉकडावुन मुळे सर्वांचे च उत्पन्नाचे स्तोत्र बंद पडले आहेत. उद्योजकां ना चालना मिळाली की त्या वर अवलंबून असणारे सप्लायर, कामगार वर्ग व जॉब वर्क करणारे छोटे व्यावसायीक अशी साखळीच आहे. उद्योजकां मधे व पुढच्या साखळी मधे जी मरगळ आली आहे, आर्थिक भीती निर्माण झाली आहे ती भीती दूर करुन पुन्हा ऊभारी येण्यासाठी बँकिंग क्षेत्राचे योगदान मोलाचे ठरणार आहे. त्या साठी बँकां कर्ज पुरवठा विभागा कडे जास्तीतजास्त लक्ष देवून आपले कर्तव्य पार पाडतील अशी खात्री आहे.
कारण कोरोना मुळे निर्मान झालेल्या आर्थीक संकटा त बँकांनाही अडचण निर्मान झाली , हप्ते थकलेत नविन कर्ज पुरवठा थांबला आहे. खर्चा साठी लोकानी ठेवी मोडायला सुरुवात केली आहे इत्यादी अडचणी बँकां नाही आहेत. त्या मुळे आपली भुमीका बैंकिंग क्षेत्र व्यवस्थीत पार पाडतिल हिच अपेक्षा.