महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ फेब्रुवारी । पिंपरी ।(अमोल एल.डंबाळे) मागील एप्रिल २०२२ पासुन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या विभागत वाहतुक नियोजन करण्यासाठी अनाधिकृत वाहनांवर कार्यवाही करण्यासाठी पोलिंसामार्फत टोईंग यंत्रणा उभी करुन यशस्वीपणे राबवत होतात. या योजनेमुळे शहरातील अनाधिकृत ठिकाणी लावलेली जाणाऱ्या वाहनांवर एक चपराक बसली होती. परंतु काही दिवसापासुन सदर यंत्रणा बंद असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्ही माहिती घेतली असता असे समजले की, सदर काढलेल्या निविदेचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे हे काम बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु शहरातील वाहनधारकांना आपल्या व पोलिसांच्या मार्फत लावलेल्या शिस्तीला खिळ बसेल.
सदर कामाच्या निविदा अचारसंहितेमुळे होणार नाही असे समजले आहे. परंतु पुवी काम करत असलेल्या एजन्सी मार्फत हे काम चालु ठेवणे आवश्यक होते
अचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सदर एजन्सी मार्फत टोईंगचे कामे चालु ठेवावीत. जेणे करुन या यंत्रणेत काम करत असलेल्या कामगारावर ही उपासमारीची वेळ येणार नाही.
शहरातील वाहनधारकास शिस्त लागली आहे टोईंग बंद झाल्यास शिस्त भंग होईल अशी चर्चा अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या व्यवसायिकाकडून ऐकायला मिळत आहे तात्काळ टोईंग कार्यवाही सुरु करावी अशी अशी चर्चा व्यवसायिकांमध्ये आज ऐकायला मिळाली .?