महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ फेब्रुवारी । शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहे. कनडी राडा प्रकरणी वैभव नाईक यांच्यासह भाजप आणि ठाकरे गटाच्या सेनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना कधीही अटक होऊ शकते.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना कनेडी राडा प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर जमाव करणे, तसंच 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात वैभव नाईक यांना अटक होऊ शकते. माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरून नाईक यांच्या विरोधात कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर गोंधळ घातला. तसेच एका रिक्षाला लक्ष्य करण्याचा देखील प्रयत्न केला.त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभाव नाईक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते हातात एक लाकडी दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. त्यांना पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला अन्यथा राडा अधिक चिघळण्याची शक्यता होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.