Chinchwad By-Eelction: मविआकडून कलाटेंना डावल्यामुळे भाजपचा विजय सोपा होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ फेब्रुवारी । चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकतीच नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण यामुळं अपक्ष राहुल कलाटे यांना डावलण्यात आल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखीव वाढणार असल्याचं बोललं जात आहे. कारण जगताप यांच्याविरोधात कलाटे हे तगडा उमेदवार होते. मविआकडून उमेदवारीसाठी ते इच्छुकही होते. पण आता त्यांना डावलल्यानं भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाल्याची चर्चाही सुरु झाली आहे. (Chinchwad By Election easy for BJP because of NCP candidature of Nana Kate not Rahul Kalate)

राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळं राजकीय फासे बदलणार आहेत. कारण शेवटपर्यंत असं वाटतं होतं की राहुल कलाटे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होईल. पण तसं झालं नाही, कारण राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी अशी भूमिका मांडली होती की, चिंचवडची जागा ही राष्ट्रवादीला मिळणार आहे तर पक्षातीलच सदस्याला इथं तिकीट मिळायला हवं तरचं आम्ही प्रचाराचं काम करु. त्यामुळं राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पण गेल्या २०१९ निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले राहुल कलाटे हे भाजपच्याविरोधात लढले होते, तेव्हा त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. कलाटे हे सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळं पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडं आल्यानं कलाटेंना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण कलाटे यांनाच जर राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली असती तर या निवडणुकीत लढत तगडी झाली असती, असं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *