महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । अजय विघे| प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे पत्नीची खंबीर साथ होती त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व वैचारिक चळवळीला गतिमान करण्यासाठी माता रमाई ची खंबीर साथ लाभली.होती. या कर्तबगार थोर माते ची कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे येथे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब,डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव कमिटीचे सचिव अरुण लोंढे, ग्रामपंचायत सदस्य मोहन गायकवाड,कुमार त्रिभुवन,खजिनदार राहुल बनकर, अंबादास मेहेरखांब, राजेंद्र गवळी, शामराव मेहेरखांब आदी उपस्थित होते.