Valentine Day : गुलाबाच्या किंमती सूसाट ; ‘रोझ डे’ लाच शॉक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । तरुणाईच नाही तर प्रत्येक वयातील व्यक्ती ज्या आठवड्याचा अधीरतेने वाट पाहता, तो व्हॅलेंटाईन आठवडा (Valentine Week) अखेर सुरु झाला आहे. युगुलांच्या प्रेमांला भरते आले आहे. प्रत्येक जण एकमेकांना, आपल्या पार्टनर इन क्राईमला काय गिफ्ट द्यायचे याची योजना आखत आहे. पण त्यांच्या उत्साहावर यंदा महागाईचे सावट आहे. महागाईच्या झळा यंदा ही प्रेमवीरांना बसणार आहे. मंगळवार, 7 फेब्रुवारीपासून, व्हॅलेंटाईन आठवडा सुरु होत आहे. संपूर्ण भारतात अचानक फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे किंमती भडकल्या आहेत. विशेषतः गुलाबाच्या किंमती (Rose Price) वाढल्या आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यामुळे सजावट करणाऱ्या फुलांचीही मागणी वाढली आहे. यंदा उत्तरेसह उर्वरीत भारतातही जोरदार थंडी होती. पण फुलांचे उत्पादन कमीच राहिले. त्यामुळे गुलाब आणि इतर सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांच्या किंमतीत जोरदार वाढ (Flower Price Hike) झाली. फुलांचे भाव 40 ते 50 टक्के वाढले आहेत.

द हिंदू या दैनिकाने फुलांच्या किंमतीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, जानेवारीत लग्न सोहळे सुरु झाले. त्यामुळे घर, मंदिर, लग्न हॉल या ठिकाणी सजावटीच्या फुलांची मागणी वाढली होती. विशेषतः मकर संक्रांतीनंतर सर्वच फुलांच्या किंमतीत अचानक मोठी वाढ झाली.

गुलाबाचे एक फुल साधारणपणे 4 वा 5 रुपयांना मिळते. पण आता लग्न सोहळा आणि व्हॅलेंटाईन आठवड्याने मागणी वाढली. आता एका गुलाबाच्या फुलासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहे. हा भाव या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

साऊथ इंडिया फ्लोरीकल्चर असोसिएशनचे संचालक श्रीकांत बोल्लापल्ली यांनी फुलांच्या किंमतींविषयी अंदाड वर्तविला आहे. त्यानुसार, सर्वंच फुलांच्या किंमतीत साधारणपणे, 10 ते 20% टक्क्यांची वृद्धी होईल. त्यामुळे प्रेमात व्यवहाराचे गणित मांडायचं नसते, असे म्हणत प्रेमवीरांना हे भाववाढीचे चटके सहन करावे लागतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *