Usmanabad : उस्मानाबादमध्ये उरुसात चेंगराचेंगरी, १४ भाविक जखमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । उस्मानाबाद शहरातील उरुसात चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. उरुसात वळू उधळल्यानं गोंधळ माजला, त्यामुळं ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. (Maharashtra Usmanabad had stampede during Uroos 14 devotees injured)

उस्मानाबाद शहरातील ‘हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे’ या उरुसात पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असतानाच यामध्ये एक वळू घुसला आणि तो उधळला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला, यामध्ये चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच हा उरुस होत असून सर्वधर्मियांचा यामध्ये मोठा सहभाग असतो. दोन-तीन दिवसाच्या या सोहळ्यात रात्रभर विविध कार्यक्रमानिमित्त भाविकांची इथं मोठी गर्दी असते. त्याप्रमाणं यंदाही या उरुसात मोठी गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *