“चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम”, अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंची भूमिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । “चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची भेट घेणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी चिंचवड मतदारसंघात घडण्याची शक्यता आहे. जनभावनेचा अनादर मी करणार नाही, असे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे हे अधिकृत उमेदवार असून, बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे असताना राहुल कलाटे हे मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

राहुल कलाटे म्हणाले की, मी २०१९ ला चिंचवड विधानसभा लढलेलो आहे. तेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा कोणी विचार केला नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या समोर मी लढलो. त्यावेळी नागरिकांनी भरभरून प्रेम दिले. पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध दिल्यास मीही विचार करेल. काही दिवसांपूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. तेव्हा ‘मी वेट अँड वॉच’च्या भूमिकेत होतो. परंतु, निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी पुढे आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. पुढे ते म्हणाले की, सचिन अहिर हे उद्या भेटणार आहेत. बहुदा त्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले असावे, असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *