स्मिथने जडेजाला दाखवला अंगठा आणि झाला ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । नागपूर कसोटीतून तब्बल 6 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाने आपल्या ओळखीच्या शैलीत अप्रतिम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला घेरले. जडेजाने उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाचे लागोपाठ दोन विकेट घेऊन कांगारू संघाला अडचणीत आणले. जडेजाने विकेट्स कशा घेतल्या हे पुढे सांगू पण त्याआधी काय घडले ते खूपच मनोरंजक आहे. खरं तर, जेव्हा रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला, तेव्हा त्याने स्टीव्ह स्मिथला त्याच्या अचूक लाइन-लेन्थने त्रास दिला.

जडेजाची गोलंदाजी पाहून स्टीव्ह स्मिथने हातवारे करायला सुरुवात केली. जडेजाच्या प्रत्येक चांगल्या चेंडूवर स्मिथने अंगठा दाखवला. स्मिथ अनेकदा गोलंदाजांसोबत अशा गोष्टी करतो. गेल्या भारत दौऱ्यावरही तो विचित्र चेहरा करत असे, त्यावर इशांत शर्माची प्रतिक्रिया खूप व्हायरल झाली होती. यावेळी स्मिथने अंगठ्याने हातवारे सुरू केले. मात्र, जडेजाने त्याच्या हातवाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारानंतर रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. या डावखुऱ्या फिरकीपटूने प्रथम लबुशेनला त्याच्या फिरकीवर यष्टीचीत केले. लबुशेनने पुढे येऊन त्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू तोंडासमोर गेला आणि यष्टिरक्षक श्रीकर भरतने त्याचे स्टंप उडवले.

लबुशेन त्याच्या अर्धशतकाच्या अवघ्या एक धावापूर्वी 49 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजाच्या पहिल्याच चेंडूवर मॅथ्यू रेनशॉ एलबीडब्ल्यू आऊट झाला. जडेजाला हॅट्ट्रिक घेण्याची संधी होती पण पीटर हँड्सकॉम्बने त्याच्या चेंडूचा बचाव केला.

दरम्यान रवींद्र जडेजा इथेच थांबला नाही. विकेटला चिकटून राहताना त्याने आपल्या सर्वोत्तम चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बोल्ड केले. स्मिथ अवघ्या 37 धावा करून बाद झाला, तर त्याला 6 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जीवदानही मिळाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *