आर अश्विनने मोडला कुंबळेचा विक्रम, मुरलीधरननंतर दुसऱ्या क्रमांकावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा फिरकीपटू आर अश्विनने मोठा विक्रम केला आहे. त्यानं एलेक्स कॅरीला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट घेण्याची कामगिरी केली. तसंच सर्वात कमी सामन्यात अशी कामगिरी करणाता तो भारतीय गोलंदाज ठरला. याआधी हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता.

अनिल कुंबळेने ९३ सामन्यात ४५० विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तर अश्विनने ८९ कसोटीत ४५० विकेट घेतल्या. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात ४५० बळींचा टप्पा पूर्ण करण्याची कामगिरी मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ८० सामन्यात हा टप्पा गाठला होता. या यादीत मुरलीधरननंतर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट आणि ३ हजार धावाही केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. अश्विनने आतापर्यंत ८९ कसोटी सामने खेळले असून त्याने ३ हजार ४३ धावा केल्या आहेत.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावात गारज झाला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर स्मिथने ३७, एलेक्स कॅरीने ३६ आणि हँडसकॉम्बने ३१ धावा केल्या. यांच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *