महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० फेब्रुवारी । पुणे कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार माघार घेणार का? हा प्रश्न आहे. हे दुपारी ३ वाजता स्पष्ट होणार आहे. राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यांशी संपर्क साधणार आहे. तसेच निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे प्रचार सभाही घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी खर्चाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आता उमेदवारांना ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. यापुर्वी ही मर्यादा २८ लाखांची होती. यामुळे उमेदवारांना मनसोक्त खर्च करता येणार आहे.