महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० फेब्रुवारी । राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत असल्याचं पहायला मिळतं. प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा रेकॉर्ड अजित पवार यांच्या नावावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्वाकांक्षा कधी लपून राहिली नाही. 2004 सालचं विलासरावांचं सरकार असो वा महाविकास आघाडी सरकार असो, अजित पवारांना मुख्यमंत्री (CM Ajit Pawar) होण्याची संधी तीन वेळा मिळाली नाही. मात्र, त्यामुळे त्यांनी कधी निराशा व्यक्त केली नाही. अशातच आता राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?
अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलंय. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत, असं वक्तव्य निलेश लंके यांनी यावेळी केलं आहे. (NCP MLA Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be the Chief Minister of Maharashtra Political News)
आत्तापर्यंत मविआतील तीनही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) करायचं असेल, तर ते संपूर्ण मविआचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील. यामुळे मविआचा मुख्यमंत्रीपदाचा पुढचा उमेदवार ठरल्याची चर्चा सुरू आहे.