महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । तुक्रिये व सीरियात आलेल्या विध्वंसकारी भूकंपात 28 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही शेकडो जणांचे मृतदेह सापडत आहेत. पण त्यात मनाला सुखावणाऱ्या घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना तुर्कियेच्या हेते प्रांतात घडली आहे. येथील एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून एक नवजात बाळ सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. भूकंपानंतर तब्बल 128 दिवसांनी हे बाळ जिवंत हाती लागल्यामुळे बचाव पथक हर्षोल्हासाची नवी लाट पसरली आहे.
नवजात बाळ जिवंत सापडल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात ते बाळ बचाव पथकातील एका व्यक्तीचे बोट तोंडात घेऊन दूध ओढण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेमुळे देव तारी त्याला कोण मारी या जुन्हा म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. यापूर्वी एनडीआरएफच्या पथकाने एका 8 वर्षीय मुलीला सुरक्षित बाहेर काढले होते.
भारताचे एनडीआरएफ पथकही तुर्कियेत बचाव मोहीम राबवत आहे. या पथकाने गुरूवारी गाजियांटेप प्रांतातील नूरदगी शहरातील बचाव मोहिमेत एका 6 वर्षीय मुलीची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली होती. भारतीय पथक ऑपरेशन दोस्ती अंतर्गत हे मदतकार्य राबवत आहे.तुर्कीये-सीरियात 28 हजारांहून अधिक मृत्यू:आकडा दुप्पट होण्याचा UNचा अंदाज; मदत न मिळाल्याने पित्याने स्वतः मुलीचा मृतदेह बाहेर काढला
तुर्कीये आणि सीरियामध्ये भूकंपामुळे खूप विध्वंस झाला आहे. दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 28,192 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा 78 हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, यूएन मदत पाठवणाऱ्या युनिटचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स म्हणाले – भूकंपातील मृतांची संख्या दुप्पट होऊ शकते. ढिगारा हटवल्यानंतर मृतदेह बाहेर काढले जातील. बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे. पण ते कधी थांबवावे हेच अद्याप कळत नाहीये.
तुर्किये आणि सीरियातून हृदयद्रावक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. दोन्ही देशांमध्ये भूकंपांनी हाहाकार माजवला आहे. भूकंपातील मृतांची संख्या आता 15,000 च्या पुढे गेली आहे. यातच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक सात वर्षांची सीरियन मुलगी तिच्या लहान भावाला ढिगाऱ्यातून वाचवताना दिसत आहे. ती ढिगाऱ्याखाली दबली गेली असली तरी ती आपल्या भावाचे रक्षण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि जबाबदारी दिसून येत आहे.