महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ फेब्रुवारी । अजय विघे | कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौकाच्या मागील बाजूस असलेल्या ‘हॉटेल रसरंग’ची भिंत पाडण्याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी गजाचा वापर करत तुफान हाणामारी झाली असून त्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस फिर्यादी प्रतीक संजय साबळे (वय-२९) रा.खडकी यांनी गुन्हा दाखल केला असून विरोधी गटाचे तुषार भाऊसाहेब गायकवाड अनकुटे,ता.येवला यांनीही दुसरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाला आहे.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव शहरात विघ्नेश्वर चौकाचे मागील बाजूस ‘हॉटेल रसरंग’ हे असून त्या ठिकाणी पूर्व बाजूस आरोपी प्रतीक सुभाष कदम यांनी असलेली इमारत व तेथील जागा खरेदी करून त्या ठिकाणी नव्या इमारतीचे काम सुरु केले आहे.ते पाडण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी ‘हॉटेल रसराज’ याची मागील बाजूकडील ईशान्य बाजूची भिंत पडली असल्याने त्या बाबत असून फिर्यादी प्रतीक साबळे व अन्य आरोपींनी आरोपींशी जाबसाल जाबसाल केला होता.त्यातून हे महाभारत घडले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी प्रतीक साबळे यांचे कोपरगाव शहरात विघ्नेश्वर चौकाचे मागील बाजूस ‘हॉटेल रसरंग’ हे असून त्या ठिकाणी पूर्व बाजूस आरोपी तुषार भाऊसाहेब गायकवाड यांच्या पूर्वजांनी सन-१९४२ साली बांधलेली इमारत व तेथील भाडेकरूमध्ये करार करून घेऊन त्या ठिकाणी नव्या इमारतीचे काम सुरु केले आहे.ती पाडण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी ‘हॉटेल रसराज’ याची मागील बाजूकडील ईशान्य बाजूची भिंत पडण्याचे काम सुरु असल्याने त्या बाबत असून फिर्यादी प्रतीक साबळे व अन्य आरोपींनी आरोपींशी जाबसाल जाबसाल केला होता.त्यातून वाद वाढून हे भांडण झाले आहे.त्यातून हा वाद शिवीगाळ आणि थेट गजाने मारहाण करण्यापर्यंत गेला असल्याचे समजते.
दरम्यान याबाबत फिर्यादी प्रतीक साबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”शनिवार दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास ‘हॉटेल रसरंग’ जवळ काम सुरु असून सदर कामात त्यांनी आपल्या हॉटेलची भिंत पाडली असून त्या बाबत आपण आरोपी प्रतीक कदम,तुषार भाऊसाहेब गायकवाड,व त्यांचे सोबत असलेले इतर पाच ते सहा जण (नावे माहिती नाही) आदींनी हॉटेलचे कौंटर फोडून नुकसान केले व शिवीगाळ करून लोखंडी रॉडने व लाथा बुक्क्यांनी हातापायावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.यात फिर्यादी प्रतीक साबळे हा गंभीर जखमी झाला आहे.