महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ फेब्रुवारी । कोपरगाव येथील पंचायत समिती कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी जालिंदर बाजीराव पाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी संग्राम गोकुळदास बोर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया संघटनेचे राज्य माजी अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या उपस्थितीत पार पडली. रमेश बांगर यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले. यावेळी तालुका महासंघाचे अध्यक्ष दिगंबर बनकर, ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक गोरक्षनाथ शेळके, अहमद शेख, सुरेश मंडलिक, सुनील नागरे, सुभाष गर्जे, अशोक नरसाळे, सचिन वीर, योगेश देशमुख, सय्यद भाऊसाहेब, रामेश्वर नेवगे, महेश काळे आदी उपस्थित होते.
कार्यकारणीमध्ये मानद अध्यक्ष म्हणून बाबासाहेब मुरलीधर गुंड, सचिव नारायण दौलत खेडकर, महिला उपाध्यक्ष सुप्रिया रमेश टोरपे, कोषाध्यक्ष सोमनाथ भीमा पटाईत, प्रसिद्धी प्रमुख अविनाश सिताराम पगारे, संघटक किरण रामसिंग राठोड, कार्याध्यक्ष आर. एस. टिळेकर व सल्लागार दिलीप बबनराव गायकवाड यांची वर्णी लागली आहे.
ही निवड २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक काळासाठी करण्यात आली आहे. निवडीनंतर अध्यक्ष पाडेकर उपाध्यक्ष बोर्डे व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक गोरक्षनाथ शेळके यांनी सांगितले की, गेल्या पंचवार्षिक काळामध्ये ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न निकाली काढण्याचे काम आपण केले आहे. यापुढेही ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रमेश बांगर यांनी सूत्रसंचालन केले. तर अध्यक्ष जालिंदर पाडेकर यांनी आभार मानले.