पुण्यात ‘या’ भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार आणि गुरुवार पुणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचं ऑडिट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. यासाठी 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे नऱ्हे, धायरी, खडकी, औंध, शिवाजीनगर, भोसले नगर, घोले रोड, सेनापती बापट रोड, हनुमान नगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी रेवेन्यू कॉलनी, पोलीस लाईन, गोखलेनगर, भांडारकर रोड, पद्मावती टाकी परिसर या भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *