5 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत:काय आहे ‘आयुष्यमान भारत योजना’, कसा करणार ऑनलाईन अर्ज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. केंद्राने 2018 पासून या योजनेला सुरूवात झाली. चला तर आज जाणून घेऊया- आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेवू शकते, लाभार्थ्यांची पात्रता कशी निश्चित होते, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय, ते कसे मिळवायचे.

सरकारकडून मिळतं ‘गोल्डन कार्ड’
कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. ‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

कोण करु शकतं अर्ज?
आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana News) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचं नाव SECC–2011 मध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, SECC म्हणजे काय? SECC म्हणजे, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

असा करा ऑनलाईन अर्ज

सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.
मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number) किंवा RSBY URN नंबर टाका.
जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.
याशिवाय, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *