महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी अजय विघे|
आज कोळपेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर रथयात्रेचे कोळपेवाडी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.जिल्हा समन्वयक विजय तमनर यांच्या नेतृत्वाखाली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षयराजे शिंदे यांच्या उपस्थितीत सध्या सर्वत्र जिल्हाभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर रथयात्रा नगर जिल्ह्यात सुरू आहे.आज कोळपेवाडी येथे ढोल ताशांच्या गजरात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुर्यभान कोळपे,माजी संचालक कचरु कोळपे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष निवृत्ती कोळपे, संचालक राजेंद्र कोळपे, सरपंच सौ.चंद्रकला सुर्यभान कोळपे,माजी उपसरपंच डाॅ.प्रकाश कोळपे, विद्यमान उपसरपंच अनिल कोळपे,चांगदेव बारकू कोळपे पतसंस्थेचे चेअरमन किरण कोळपे,सुकदेव कोळपे, वसंत कोळपे,संतुनाना कोळपे, वसंत लकडे यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी माहेश्वर मंदिरातील सभामंडपामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी आराध्या सागर कोळपे या मुलीने अहिल्यादेवी यांनी वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले अवतार कार्य सर्व भारतभर आहे शासनाने कुठल्याही आंदोलनाची वाट न बघता नामांतर करावे.या बाबतीत कुणाचा विरोध असेल तर आगामी काळात जनताच त्याचा न्याय करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.