पिंपरी चिंचवड मनपा नगररचना विभागचा सावळा गोंधळ.

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे – पिंपरी चिंचवड मनपा नगररचना विभागचा सावळा गोंधळ..
“अंधळे दळते अन कूत्रे पिठ खाते”
पंधरा वर्षांपूर्वी मनपाने ताब्यात घेतलेल्या जागा मालकाला प्रॉपर्टी जप्तीची नोटीस
पिंपरी चिंचवड मनपा कर संकलन ब क्षेत्रीय विभागाने एका नागरिकाला दिली नोटीस
2008 पासून ते 2023 पर्यंतचा दोन टक्के दंडासह संपूर्ण टॅक्स भरा अन्यथा प्रॉपर्टी
श्रीयुत शरद हरिश्चंद्र कस्तुरे यांनी तानाजी नगर चिंचवड या ठिकाणी सिटी सर्वे नंबर
1242/1244/1256 या ठिकाणी 1000 स्क्वेअर फूट जागा विकत घेऊन 1990 साली चार
खोल्यांचं घर बांधलेले होते व या ठिकाणी ते आपल्या कुटुंबासह राहत होते कस्तुरे यांनी
1990 पासून 2008 पर्यंतचा घराचा संपूर्ण टॅक्स व पाणीपट्टी नियमाप्रमाणे भरलेली आहे
2008 साली पिंपरी चिंचवड मनपा नगर रचना विभागाने कस्तुरे यांना नोटीस पाठवून सदरचे
बांधकाम हे मनपाच्या विकास आराखड्याला बाधा ठरत आहे तरी ते 30 दिवसाच्या आत
काढून घ्यावे अन्यथा मनपातर्फे पाडून त्याचा खर्च आपल्याकडून वसूल केला जाईल व
आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे नोटीस पाठवली त्यावेळचे तत्कालीन
महापौर यांनी कस्तुरी यांना सदर जागेच्या बदल्यात योग्य तो मोबदला मिळवून देण्याचे
आश्वासन दिले होते महापौर एक आदरणीय व प्रतिष्ठित व्यक्ती समजून कस्तुरी यांनी आपले
राहते चार खोल्यांचे घर स्वतः पाडून सदरची जागा मनपाच्या ताब्यात दिली व लगेचच कर
संकलन विभाग ब क्षेत्रीय कार्यालय यांना सदर घराचा टॅक्स व पाणीपट्टी बंद करण्यात यावी
असे विनंती पत्र सुद्धा दिले त्यानंतर जवळपास नऊ वर्षे मनपा ने श्री कस्तुरे यांना एक रुपया
सुद्धा नुकसान भरपाई किंवा मोबदला दिला नाही श्री कस्तुरे यांनी तत्कालीन महापौर यांच्या
घराच्या अक्षरश: पायऱ्या झिजवल्या शिवाय मनपा नगररचनेच्या पायऱ्या झिजवल्या पण
त्यांना मोबदला मिळाला नाही त्यानंतर कस्तुरी यांनी जागृत नागरिक महासंघाची मदत
घेण्यासाठी भेट घेतली आणि जागृत नागरिक महासंघाने माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा चालू करताच केवळ चार महिन्यात श्री कस्तुरे यांना 32 लाख 12 हजार 63 रुपये इतका मोबदला मंजूर झाला
अशा रीतीने पिंपरी चिंचवड मनपाने 2008 सालीच ‘अ’ आणि ‘ब’ पत्रक भरून जागेचा रीतसर ताबा घेतलेला असताना सुद्धा
आज पंधरा वर्षानंतर पिंपरी चिंचवड मनपा कर संकलन विभाग ब क्षेत्रीय कार्यालय यांनी सदर जागा मालकाला 2008
पासून चा संपूर्ण टॅक्स दोन टक्के दंडासहित भरा अन्यथा प्रॉपर्टी जप्त करू अशी नोटीस बजावून त्याला मानसिक त्रास
दिलेला आहे आणि त्याच्या व्यक्ती स्वतंत्र्यावर घाला घातलेला आहे सदरची नोटीस म्हणजे पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ
कारभाराचा उत्तम नमुना म्हणावा लागेल या संदर्भात आम्ही पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त मा शेखर सिंह यांच्याकडे लेखी
तक्रार करून नोटीस पाठवणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र दिलेले आहे.
त्याचप्रमाणे सदर नोटीसीमुळे संबंधित नागरिकाला जो काही मानसिक त्रास झालेला आहे त्याची भरपाई कोण करणार असा
सवाल देखील आम्ही सदर पत्रातून केलेला आहे
या वेळी शशीकांत यादव
प्रकाश राडवे, उमेश सनस, हत्तरप देवकर, मच्छीन्द्र कदम, अशोक कोकणे, शरद कस्तुरे, राजश्री शिरधे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *