टाटांची जगातील सर्वात मोठी विमान खरेदीची डील ; बोईंग विमानांची संख्या स्पर्धकांना धडकी भरवणारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । टाटा समूहाने (Tata Group)आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान वाहतूक करार केला आहे. यामुळे मंगळवारचा दिवस विमान इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिला जाणार आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने (Air India) 470 विमान खरेदीच्या सौद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यात एअर इंडिया 250 एअरबस (Airbus) विमाने खरेदी करणार आहेत. तसेच 220 बोइंग विमाने (Boeing )आहेत. या सौद्याची किंमत 6.40 लाख कोटी रुपयांवर आहे. या करारामुळे भारत, फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लडमध्ये रोजगारनिर्मिती होणार आहे.

फ्रान्सच्या एअरबससोबतच्या करारावेळी व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्यूअल मॅक्रो, टाटा समूहाचे अध्यक्ष एमरिट्स रतन टाटा (Ratan Tata)आणि एअरबसचे प्रमुख गुयलॉमे फॉरी उपस्थित होते. यावेळी टाटा सन्सचे चेअरमन के. चंद्रशेखरन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर समूहाने अमेरिकी कंपनी बोइंगसोबतही करार केला.

टाटाने सुरु केले मोठे बदल
टाटा समूहाने 69 वर्षांनंतर पुन्हा एअर इंडियाची मालकी घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बदल सुरु केले आहेत. मंगळवारी केलेले करारानंतर हवाई क्षेत्रात एअर इंडियाची मालकी 30 टक्के होणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील एअर इंडियाचा हा करार कंपनीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे प्रवाशांना आधिक चांगल्या सुविधा मिळणार आहे. यानंतर, भारतीय विमान कंपनी देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रातील तिसरी मोठी कंपनी बनेल. टाटा समूह अनेक दिवसांपासून या कराराची तयारी करत होता. हा करार पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या इंधन खर्चात लक्षणीय घट होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वस्त तिकिटे देणे सोपे होणार आहे.

चार देशांचा होणार फायदा
टाटा समूहाच्या या सौद्यामुळे फ्रान्स, अमेरिका, इंग्लड आणि भारताचा फायदा होणार आहे. कारण विमाने अमेरिका आणि फ्रान्समध्ये बनणार आहे. इंजिन इंग्लडमध्ये तयार होणार आहे. भारतात विमाने येणार असल्याने हवाई क्षेत्रातील रोजगार निर्मिती वाढणार आहे.

17 वर्षांनंतर विमाने खरेदी

एअर इंडियाने 2005 नंतर एकही विमान खरेदी केले नव्हते. आता 17 वर्षानंतर विमान खरेदी केली आहे. यापासून एअर इंडियाला उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियात आपले अस्तित्व वाढवण्यास मदत मिळेल.

मोदी काय म्हणाले
एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील विमानांच्या या कराराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘या ऐतिहासिक करारासाठी मी एअर इंडिया-एअरबसचे अभिनंदन करतो.’ टाटा समूहाने ऑर्डर केलेल्या विमानांमध्ये 140 A320 विमाने, 70 A321 निओ विमाने आणि एअरबसची 40 A350 विमाने आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *