वाय-फाय पासवर्ड रिकव्हर करायचा ? वापरा हे भन्नाट जुगाड…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ फेब्रुवारी । वाय-फाय पासवर्ड असा आहे की तो पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कालांतराने तो पासवर्ड आपल्या लक्षात राहत नाही. जर एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने तुमचा वाय-फाय पासवर्ड विचारला, तर आपण आमच्या वाय-फाय पासवर्डसाठी काय शब्द किंवा अंक ठेवलेत (How To Recover Wi-Fi Password) हेच विसरून गेलेलो असतो. नवीन फोन किंवा डिव्हाइस कनेक्ट करताना वायफाय पासवर्ड विचारला जातो. पण कितीही विचार केला तरीही आपल्याला तो काही केल्या आठवत नाही. मग तो कसा रिकव्हर करायचा, हेच आपण पाहूया.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, हे Wi-Fi हॅक करण्यासाठीच्या सूचना नाहीत. कारण एखादं वाय-फाय हॅक करणं बेकायदेशीर आहे आणि तुम्ही त्या संदर्भात काही केलंत तर अधिक गंभीर संकटात सापडू शकता. या बातमीत आम्ही फक्त तुमचा स्वतःचा Wi-Fi पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी काय करावं ते सांगत आहोत. तुम्ही तुमचा Wi-Fi नेटवर्क पासवर्ड विसरला असल्यास, तो रिकव्हर करण्यासाठी पुढील स्टेप्स कराव्या लागतात.

वाय-फाय पासवर्ड कसा रिकव्हर करायचा?

तुम्हाला ऑफिस किंवा इतर कोणत्याही वाय-फायचा पासवर्ड जाणून घ्यायचा असेल तर ही पद्धत पासवर्ड दाखवणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही विसरलेला पासवर्डच यातून दिसू शकेल.

अशा प्रकारे करा पासवर्ड रिकव्हर…

– Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेला पीसी वापरून, Start > Control Panel > नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर वर जा.
– Windows 8 कॉम्प्युटरवर, तुम्ही Windows Key +C वर टॅप करू शकता, सर्च वर क्लिक करू शकता आणि नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर शोधू शकता.
– डाव्या साइडबारवरील चेंज अॅडाप्टर सेटिंग्ज वर क्लिक करा.
– तुम्ही वापरत असलेल्या वाय-फाय नेटवर्कवर राईट-क्लिक करा आणि Status वर क्लिक करा.
– वायरलेस प्रॉपर्टीजवर क्लिक करा आणि सिक्युरिटी टॅबवर क्लिक करा.
– आता तुम्हाला Wi-Fi नेटवर्कचे नाव आणि छुपा पासवर्ड दिसेल. खाली दिलेल्या चेक कॅरेक्टर्सवर क्लिक करताच पासवर्ड दिसेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *