महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० फेब्रुवारी । Constipation Problem : बद्धकोष्ठताचा त्रास ही एक सामान्य समस्या झाली आहे. त्या मागचे कारण अनिश्चित जीवनशैली असू शकते तसेच अल्कोहोल पिणे, जास्ती खाणे, आहारात फायबरचा कमी अभाव, जंग फूडचे सेवन, जास्त मास खाणे, धूम्रपान करणे, कमी पाणी पिणे कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाली न करणे हे काही त्या मागची कारणे आहेत.
बद्धकोष्ठतेच्या समस्या वेळीच बऱ्या झाल्या नाही तर पुढे मूळव्याध सारखा गंभीर रोग होऊ शकतो. बद्धकोष्ठताचा त्रास कमी करण्यासाठी काय घरगुती उपाय आहेत? बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करण्यासाठी भरपूर फायबर युक्त अन्न आणि द्रव यांचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच आयुर्वेदिक घरगुती (Home Remedies) उपाय करून तुम्ही या समस्या पासून सुटका करू शकतो.
भाजलेली बडीशेप –
एका जातीचे बडीशेप खाल्ल्याने गॅस्ट्रिक एंजाइम निर्माण होण्यास मदत मिळते. तसेच ते पचनास सहकार्य करते आणि आतड्यांमध्ये होणाऱ्या हालचालींना चालना मिळते. त्यामुळे बद्धकोष्ठताचा त्रास कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात (Water) एक चमचा भाजलेली बडीशेप मिक्स करून त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.
बेलाच्या फळाचा रस –
बेलाच्या फळांमध्ये उपलब्ध असलेल्या रचक गुणधर्म बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करण्यास मदत करते. तुम्हाला रात्री जेवणापूर्वी अर्धी वाटी बेलाचा पल्प आणि एक चमचा गुळा सोबत सेवन करा.
त्रिफळा –
बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर कण्यासाठी सर्वात प्रभावी त्रिफळा आयुर्वेदिक उपाय आहे. त्यासाठी तुम्ही गरम पाण्यात त्रिफळ मिसळून चहा बनवून पिऊ शकता किंवा अर्धा चमचा धने, एक चतुर्थांश चमचा वेलचीचे दाने घालून ते मिक्सर ग्राइंडर मध्ये बारीक करून एक ग्लास पाण्यात मिसळून घेतल्याने तुमच्या समस्या दूर होते.