राज्यासह संपूर्ण देशात सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यात ; कोरेगाव पार्क @ 40 अंश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । मंगळवारी पुणे शहरातील कोरेगाव पार्कचे कमाल तापमान राज्यासह संपूर्ण देशात सर्वाधिक 40 अंश नोंदवले गेले. फेब्रुवारीतच शहरासह जिल्ह्याचा पारा प्रथमच या हंगामात चाळिशीत गेला आहे. संपूर्ण जिल्हाच यंदा देशात सर्वाधिक तापल्याची नोंद मंगळवारी झाली. पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी शहर व जिल्ह्याचा तापमानाचा तक्ताच रात्री शेअर केला. त्यात कोरेगाव या शहरातील अतिविकसित भागाचे तापमान चक्क 40 अंशांवर पोहोचल्याची नोंद झाली. यंदाच्या हंगामात राज्यात कोरेगाव पार्कचा पारा सतत वेगान वाढत आहे. 15 फेब्रुवारीला या भागाचे तापमान राज्यात सर्वाधिक 37 अंश इतके होते. त्यानंतर 18 रोजी 38.5 अंशांवर गेले. त्यानंतर राज्यातील जळगाव, गोंदिया शहराचे तापमान 39 अंशांवर गेले. मात्र, पुन्हा राज्यातील शहरांचे तापमान एक ते दोन अंशांंनी कमी झाले होते. मंगळवारी पुन्हा शहरासह जिल्हा पुन्हा तापायला सुरुवात झाली.

देशात कोरेगाव पार्कच ‘हॉट’
देशातील सर्व शहरांचे कमाल तापमान तपासले असता असे लक्षात आले की, कोरेगावचा पारा मंगळवारी देशात सर्वाधिक 40 अंशांवर गेला. त्यापाठोपाठ लवळे, राजगुरुनगर, शिरुर, वडगाव शेरी या भागाचे तापमान 38 अंशांवर गेले होते.

पुणे जिल्ह्यातील मंगळवारचे कमाल तापमान
कोरेगाव पार्क 40, लवळे 39.2, राजगुरुनगर 39.2, शिरुर 38.5, वडगावशेरी 38.4, चिंचवड 38.3, हडपसर 37.9, खेड 37.7, पुरंदर 37.4, बालेवाडी 37.2, मगरपट्टा 37.6, तळेगाव दाभाडे 37.2, शिवाजीनगर 36.7, पाषाण 36.7, एनडीए 36.5, दौंड 35.7, बारामती 35.5, आंबेगाव 35.3, हवेली 35.3, निमगिरी 34.5, भोर 34.4, लोणावळा 34.2, लवासा 33.4

कोरेगाव पार्कचा पारा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लवकर चाळिशी पार करेल, असा अंदाज आहे. यंदा तो 21 फेब—ुवारीलाच 40 अंशांवर गेला आहे. मंगळवारी तेथील कमाल तापमान राज्यात व देशात सर्वाधिक नोंदवले गेले. -डॉ. के. एस होसाळीकर, वेधशाळा प्रमुख, पुणे

मंगळवारी देशात सर्वाधिक तापलेली शहरे (अंश सेल्सिअस)

कोरेगाव पार्क,
40
लवळे,
39.2
राजगुरुनगर, 39.2
अकोला,
38.5
वडगाव शेरी,
38.4
चिंचवड,
38.3
राजकोट
(गुजरात) : 38.4
अहमदाबाद
(गुजरात) : 37.2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *