महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – बीड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास सात नावे व्हेंटिलेटर उपलब्ध बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास हाफकिन महामंडळ मार्फत नवीन सात व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत हाफकिन जीव -औषध निर्माण महामंडळाचे राजेश देशमुख यांनी ना धनंजय मुंडे यांच्या विनंती वरून हे सात व्हेंटिलेटर त्यांच्या सी एस आर निधीतून या रुग्णालयाला मोफत दिले आहेत. आज पर्यँत सदरील रुग्णालयात 13व्हेंटिलेटर होते त्यापैकी 3 व्हेंटिलेटर हे कोविड 19साठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर उर्वरित 10 व्हेंटिलेटर हे इतर रुग्णांनसाठी ठेवले आहेत
मा.ना.धनंजय मुडे हे गेल्या आठवड्यात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास भेट दिली होती त्यांनी त्यावेळेस रुग्णालयातील साधन साम्रगी विषयी चर्चा करण्यात आली होती. बीड जिल्यात कोविड 19या विषाणू ने शिरकाव केले असल्यामुळे हाफकिन महामंडळाच्या राजेश देशमुख यांच्याशी संवाद सादून ही सात व्हेंटिलेटर रुग्णालयास दिली आहेत.
याचं प्रमाणे या रुग्णालयास एम आर आय मशीन सुद्धा लवकरच मिळून देण्याचेआश्वासन मा.ना धनंजय मुंडे यांनी रुग्णालयास दिली असून तशी मागणी हाफकिन महामंडळास केली असल्याचे सांगण्यात आले आहे. ती सात व्हेंटिलेटर ही आज रुग्णालयास उपलब्ध होतील ती काल मुंबई येथून निघाली आहेत.या व्हेंटिलेटर मुळे रुग्णालयास नवसंजीवनी मिळाल्या सारखे वाटत आहे यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी फार मोट्या प्रमाणात मदत होईल असे या रुग्णालयाचे अधिष्टता ड्रा. सुधीर देशमुख यांनी रुग्णालयास साहित्य उपलब्ध करून दिल्या मुळे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.