महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी- पी.के. महाजन – RBI ने जुन ते ऑगस्ट ‘ 2020 ह्या तीन महिने छे हप्ते वसुली पुढे ढकललेली आहे. कारण मार्च,एप्रिल व मे चे हप्ते भरण्याची मुदत 31 मे ला संपणार होती. जुन पासुन बँक हप्ते वसुली साठी सुरुवात करणार होते.
पुढच्या तीन महिन्याचे जुन,जुलै,ऑगस्ट चे हप्ते पुढे ढकलल्या मुळे सर्व प्रकारच्या कर्जधारकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मार्च ते ऑगस्ट ह्या सहा महिन्याचे व्याज टर्म लोन मधे वर्ग करुन बँक वसुल करणार आहे. कर्जधारकांची आजची चिंता दूर करुन RBI ने वेळेची मदत करुन लॉकडावून मधे महत्वाचा दिलासा दिला आहे.