Income Tax : या कारणांमुळे इन्कम टॅक्सच्या रडारवर येतात लोक, शोधले जाताता जुने रेकॉर्डस, वाढतात अडचणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ फेब्रुवारी । काही लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस आली असल्यााबाबत तुम्ही ऐकलं असेल. संबंधितांकडून होणाऱ्या चुकांमुळे या नोटिसा येतात. सर्वसाधारणपणे या पाच चुकांमुळे इन्कम टॅक्स विभागाकडून नोटिस पाठवली जाते.आयटीआर फॉर्ममध्ये चुकीची माहिती देण्यात आल्यास इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला नोटिस पाठवू शकतो. दोन प्रकारच्या निवड प्रक्रियेमध्ये पहिली मेन्युअल. आणि दुसरी अनिवार्य असते. पहिल्या निवड प्रक्रियेमध्ये काही गोष्टींची खबरदारी घेऊन वाचता येते. मात्र दुसऱ्या प्रक्रियेमध्ये या गोष्टी उघडकीस येतात.

अनेकदा आयटीआर न भरल्यामुळेसुद्धा विभागाकडून तुम्हाला नोटिस पाठवली जाते. जर तुमचे उत्पन्न हे सवलतीच्या मर्यादेबाहेर असेल तर तुम्ही आयटीआर भरणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुमच्याकडे परकीय मालमत्ता असेल तरीही तुम्ही आयटीआर भरणे आवश्यक आहे.जर तुमच्याकडून रिटर्नमध्ये भरलेले टीडीएस आणि जिथून भरला आहे. त्याच्या भरण्यामध्ये फरक दिसत असेल तर तुम्हाला नोटिस येते. त्यामुळे किती टीडीएस कापला गेला होता, ते पाहा आणि नंतरच त्याचा उल्लेख रिटर्नमध्ये करा.

तुम्ही कुठल्याही आर्थिक वर्षामध्ये जी काही कमाई करता ती आयटीआरमध्ये अवश्य सांगा. अनेकदा लोक अकाउंट, एफडी आणि रिंकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजाची माहिती आयटीआरमध्ये देत नाही.काही लोक आयटीआर रिटर्नमध्ये चुका करतात आणि आवश्यक माहिती देणे टाळतात. जर असं झालं तर इन्कम टॅक्स विभागाकडून नोटिस येऊ शकते. त्यामुळे तुम्ही कुठल्यातरी तज्ज्ञाकडूनच आयटीआर फाइल करून घ्या.

जर तुमच्या अकाऊंटमध्ये कुठलाही मोठा व्यवहार झाला असेल, किंवा अधिक रोख पैसा जमा झाला असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटिस येऊ शकते. उदाहरणार्थ जर कुठल्याही व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असेल आणि त्यामध्ये वर्षभरात खात्यामध्ये १२ लाख रुपये टाकले तर तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *