कोल्हा आडवा आला न् घात झाला ! पितापुत्राचा जागीच अंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ फेब्रुवारी । अमरावती जिल्ह्यात सातत्याने रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कालचा गुरुवार हा जिल्ह्यासाठी अपघाताचा वार ठरला. कारण सकाळी ट्रक आणि दुचाकीचा धडकेत एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला, तर संध्याकाळी चांदुर रेल्वे तालुक्यात कोल्हा आडवा आल्याने दुचाकी व चारचाकी मध्ये अपघात होऊन बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन अपघाताच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

दिनेश प्रभाकरराव तायडे (वय ३२ वर्ष) व प्रभाकर उत्तमराव तायडे (वय ५७ वर्ष) दोघेही रा. भिलटेक ह. मु. बोरगाव मेघे, वर्धा) असे मृतक पिता पुत्राची नावं आहेत. प्रभाकर तायडे व त्यांचे पुत्र दिनेश हे दोघे कामासाठी मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे येथे वास्तव्याला आहेत.

दरम्यान, गुरूवार ते दुचाकीने बोरगाव मेघे वरुन भिल टेक येथे येत होते. तळेगाव दशासर ते चांदूर रेल्वे मार्गावरील राजनाथ फाटकाजवळ तायडे यांच्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या झालो कारसोबत धडक झाली. या अपघातात जबर दुखापत झाल्यामुळे तायडे पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती चांदूर रेल्वेचे पोलिस निरीक्षक सुनील सोळंके यांनी दिली. कोल्हा आडवा आल्यामुळे बाईक आणि कारचा अपघात झाल्याचं वृत्त आहे.

अपघाताची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले होते. एकाचवेळी अपघातात तरुण मुलाचा व त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती भिलटेक व बोरगाव गावात पोहोचताच गावकऱ्यांनी दुःख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *