महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ फेब्रुवारी । राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधे तापमाणाचा पारा 37 अंशावर , नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे . गेल्या काही दिवसांत हवामानात होणाऱ्या बदलामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे . गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडीचे वातावरण, तर दिवसा उष्णता आहे. तापमान ३७ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. विषाणू संसर्गामुळे नागरिकांना ताप, सर्दी, खोकला हे आजार होत आहेत.