Pune Bypoll Election :पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बजावले ‘हे’ आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ फेब्रुवारी । Pune Bypoll Election News : पुण्यातील पोटनिवडणुकीत जोरदार चुरस दिसून येत आहे. (Pune Bypoll Election) प्रचारात दिग्गज नेते सहभागी झाल्याने निवडणुकीची रणधुमाळी दिसून आली. (Maharashtra Political News) कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. (Political News) दरम्यान, मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

आज 6 वाजल्यानंतर कडक आचारसंहिता
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कडक आचारसंहिता लागू होणार असून उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी रोड शो करणार आहेत. दुपारी हा रोड शो सुरु होईल. तर मविआचे नेतेही भव्य रॅली काढणार आहेत.

राजकीय नेत्यांनी पिंजून काढलेत मतदारसंघ
गेल्या 18 दिवसांपासून भाजप, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढलेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्यासह विविध नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या प्रचार सभा, दुचाकी रॅली मतदारसंघ ढवळून निघाला. मात्र हा राजकीय धुरळा आज संध्याकाळी शांत होणार आहे. दोन्ही पोटनिवडणुकींसाठी रविवारी मतदान पार पडणार आहे.

पुण्यात दुकाने, टपऱ्या रविवारी बंद
तर पुण्यात रविवारी मतदान असल्याने पोलिसांनी आस्थापने बंद ठेवण्यासाठी आदेश काढले आहेत. मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *