गृह, वाहन कर्ज स्वस्त; कर्जफेडीला मुदतवाढ – शक्तिकांत दास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – पी.के..महाजन – भारतीय रिझर्व्ह बॅँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपोदरामध्ये केलेल्या कपातीमुळे विविध प्रकारची कर्जे स्वस्त होणार असली तरी ठेवींवरील व्याजदर कमी होणार असल्याने निवृत्त व्यक्तींचे उत्पन्न मात्र घटण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय घेतलेल्या कर्जाचे दरमहाचे हप्ते भरण्याला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ (मोरॅटोरिअम) देण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केल्याने कर्जदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.

सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बॅँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीची बैठक नियोजित वेळेच्या आधीच घेण्यात आली. त्यामध्ये रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्जावरील व्याजदरामध्ये कपात होणार असून नागरिकांना कर्जे कमी व्याजाने मिळू शकणार आहेत. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो दरामध्येही ०.४० टक्के कपात करून तो ३.३५ टक्के केला जाणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अधिक रोकड येऊन चलन टंचाई कमी भासेल असा अंदाजही रिझर्व्ह बॅँकेने व्यक्त केला आहे.

कर्जावरील हप्ते भरण्याला आणखी
03 महिन्यांची मुदतवाढ (मोरॅटोरिअम) दिल्याचे दास यांनी जाहीर केले आहे. रिझर्व्ह बॅँकेने याआधी ०१ जूनपर्यंत अशी मुदतवाढ दिली होती. त्यामध्ये आता
31 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात येत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *