कर्ज परत फेडीची पात्रता असतांना ही…बँकांनी कर्ज पुरवठा करण्यास नकार दिला तर त्या बँकांची लेखी तक्रार तपशीलवार RBI.कडे करावी ; .पी.के..महाजन…कर सल्लागार.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – पी.के..महाजन – कर्ज परत फेडीची पात्रता असतांना ही…बँकांनी कर्ज पुरवठा करण्यास नकार दिला तर त्या बँकांची लेखी तक्रार तपशीलवार RBI.कडे करावी. व त्याची प्रत सरकारकडे पाठवावी, जेणे करुन सरकार दरबारी त्या बँकेची नोंद झाली पाहीजे….. कोरोना मुळे उदभव्लेल्या आर्थीक अडचणीतून मार्ग निघन्या साठी सरकारने 20 लाख करोडच्या पैकेज मधे एमएसएमई(MSME) तील उद्योजक-व्यापार व सेवा पुरवठा धारकांना आर्थीक संकटातून बाहेर पडता यावे व आपले उद्योग व्यवसाय पुर्व पदावर आणण्यासाठी अनेक सवलती असणारया कर्ज योजना जाहीर केल्या आहेत सदर कर्ज योजना आमलात आणाव्यात असे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. MSME शी निगडीत कर्ज योजनांना आर्थिक विषयक समितीनेही मंजुरी दिली आहे….

तरी सदर योजनांच्या सवलतींचा वेळेवर लाभ घेणे आपला अधिकार आहे…. तरी गरजूं नी बँकेत कर्जाची मागणी अर्ज फाईल दाखल करतांना बँकेच्या नियमानुसार सर्व कागदपत्रासह प्रकल्प अहवालासहीत फाईल दाखल करावी जेणे करुन बँकेला त्यात काही त्रुटी सापडणार नाहीत. समजा बँकेने कर्ज मंजूर करण्यास नकार दिला तर लगेच बँक अधिकारी शी किंवा बँक मैंनेजर शी भांडु नये. कारण ते त्याचीच वाट पाहतात व भांडणा चे निमीत्त भांडवल करुन कर्ज पुरवठा करता येणार नाही असे उत्तर देवून मोकळे होतात. आपणाकडून त्यांना असे करण्याची संधी मीळु नये म्हणून आपन शांत पणे आपली बाजू समजावून सांगावी व आम्हाला कर्ज पुरवठा करणे बँकेचे कर्तव्य आहे असे पटवून द्यावे. तरीही बँक अधिकारी आपले म्हणणे ऐकत नसेल तर त्यांना सरकारी भाषेत सांगावे की ठीक आहे कर्ज द्यायचे की नाही तुम्ही ठरवा हा परंतू मला माझ्या कर्ज अर्जाची आज पोहच द्या मी पुन्हा आठ दहा दिवसात येईन तेंव्हा कर्ज मंजूर चे पत्र द्या नाहीतर कर्ज का नाकारण्यात येत आहे त्याचे लेखी उत्तर द्यावे .कर्ज का नाकारण्यात येत आहे त्याची कारणे लेखी स्वरुपात बँकेच्या लेटर पैड वर सही शिक्का व फाईल नाकारणारया अधिकरी चे नाव सहीत उत्तर घ्यावे . लेखी उत्तर घेतल्या शिवाय बँकेतून बाहेर पडू नये……….

अशा परिस्थीत बँक अधिकारी कर्ज नाकारण्यापुर्वी दहा वेळा विचार करेल व हळु हळु कर्ज देण्यास होकार देईल. त्याने कर्ज देण्यास होकार दिला की नम्रपणे त्याचे आभार माना व आपले काम करुन घ्यावे…. नाहीतर समजा त्याने लेखी नकार दिला तरी त्यांनी दिलेल्या लेखी उत्तराचे पुराव्यानिशी त्यांची उच्च अधिकारी कडे लेखी ऑनलाइन तक्रार करावी व त्याची प्रत RBI कडे व वित्त मंत्रालयाकडे पाठवावी…थोड्या दिवसांनी बँकेतून फोन येईल किंवा बोलावणे येईल की आपले कर्ज मंजूर जा झाले आहे,कृपया बँकेत यावे…..हे सर्व तेंव्हा होईल जेंव्हा तुम्ही कर्ज घेण्यास पात्र असाल…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *