महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी अजय विघे- .. याबाबतीत अधिक असे की काल पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे हे ग्रामीण रुग्णालय येथे गेले होते यावेळी त्यांनी ऑनड्युटी असलेल्या डॉक्टर व स्टाफ ची चौकशी केली यावेळी त्यांनी कामावर असलेल्या परिचारिकेला वैद्यकीय अधीक्षक यांना फोन करण्यास सांगून त्या भ्रमणध्वनी वरून शिवीगाळ करून माझ्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच तेथील एका रुग्णाच्या नातेवाईकाशी देखील असे कृत्य केल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ला काल रात्री गुन्हा देखील दाखल झाला आहे. याबाबतीत शहरात चर्चेचा विषय रंगला असून ठिकठिकाणी फक्त कसं झालं असेल, तहसीलदार खरंच दारू पेलेले असतील का, किंवा त्यांच्या बदनामीकारिता हे षडयंत्र रचले जात आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे. तर रात्री दोन वाजेच्या दरम्यान येवला नाक्याजवळील महसूल विभागाच्या यंत्रनेशी संबंधित व्यक्तीच्या परमिट बार उघडून दारू एका महसूल अधिकाऱ्याने पोहच केल्याची चर्चा रंगत आहे. अधिकारी कोण, दारू कोण्ही बार मधून काढून दिली, त्याने कोन्हाला पोहच केली ती दारू कोण्ही कोण्ही प्राशन केली कोठे दारूची बैठक रंगली लवकरच या प्रकरणाची सविस्तर वृत्त आपणासमोर येईल.