महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा : ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार सन 2019 करीता नामांकन सादर करावयाचे आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक मंत्रालय यांच्यावतीने सदर पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्काराबाबतची नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सदर नामांकन / प्रस्ताव 26 मे 2020 पर्यंत क्रीडा संचालनालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.