महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलडाणा : महाडीबीटी प्रणालीवर सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर 1425 अर्ज प्रलंबित आहेत. सदर शिष्यवृत्ती, प्रथम हप्ता शिष्यवृत्ती , शिक्षण व परीक्षा शुल्क अर्ज महाविद्यालयास महाडीबीटी प्रणालीवर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यास 26 मे 2020 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.
महाविद्यालय प्राचार्य यांनी अर्ज तात्काळ अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईन सादर करावे. शासनाकडून अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.