महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ मार्च । कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. दरम्यान, ‘पुण्यातील कसबा पेठेची निवडणूक ही रासने विरुद्ध धंगेकर अशी आहे म्हणतात. पण Who is Dhangekar?’ असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी रविंद्र धंगेकर कोण? असा खोचक सवाल महाविकास आघाडीला विचारला होता. तर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावल्यानंतर रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पब्लिक की डिमांड थी… तो भाऊ को आना पडा.. साऱ्या पुन्यात इतिहास घडला पायरी यशाची एक एक चढला विरोधकांचा धुरळा उडला बघा कार्याचा प्रकाश पडला आला आला आला रवींद्र धंगेकर आला…, अशा मीम्सचा देखील सोशल मीडियावर वर्षाव होताना दिसतोय.