प्रतिनिधी सलमान मुल्ला :- याबाबत सविस्तर माहिती अशी की येरमाळा येथील सतीश महादेव बारकूल वय ५५ वर्षे यांचा मुलगा रामराजे सतिश बारकुल वय २३ वर्षे हा त्याच्या कुटुंबियांना त्रास देत होता.
दिनांक 1 मार्च रोजी रात्री तो पुन्हा दारु पिऊन घरी आला आणि त्याची वडिलांसोबत वादावादी झाली.
याच वादावादी दरम्यान रामराजेने तुम्हाला व आईला जीवे मारून टाकी अशी धमकी दिली होती.
नंतरतो शेतात निघून गेला त्याचे वडील सतीश हे रोजच्या भांडणामुळे वैतागून गेले होते सतीश यांनी रामराजे यास जीवे मारण्याच्या हेतुने गुरूवार दिनांक 2 राजी पहाटे ५ च्या सुमारास कळंब – येरमाळा रोडवरील शेतातील असणाऱ्या गोठ्यामध्ये झोपेत असणाऱ्या मुलाच्या डोक्यात दगड घातले.यात रामराजे याचा जागीच मृत्यू झाला.
सतीश बारकुल यांनी त्यांचा लहान भाऊ लालासाहेब महादेव बारकुल यास मुलाचा अंत्यविधी झाल्यानंतर खून केल्याचे सांगितले. लालासाहेब बारकुल यांच्या फिर्यादीवरुन येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारी सायंकाळी सुरू होती.
बापानेच मुलाचा खून केल्यामुळे कळंब तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र याच गोष्टीची चर्चा होत आहे….