Ravindra dhangekar : आमदार रवींद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०३ मार्च । कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी निवडूण आल्यावर सकाळीच भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेतली.कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक निकालानंतर आज सकाळीच भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेतली.

पुण्याच्या गिरीश बापट यांना भेटण्यासाठी महात्मा फुले संग्रहालय येथे आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांच्यासोबत कॉंग्रेस नेते अंकुश काकडे देखील होते.अडचण येईल तेव्हा मला सांग मी मदत करेन, असं गिरीश बापट धंगेकरांना म्हणाले.

गिरीश बापटांनी धंगेकरांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप-मविआने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांनी निवडणुकीच्याप्रचारासाठी कसब्यात हजेरी लावली होती.मात्र 28 वर्षांनंतर पुण्यातील कसबा मतदारसंघात कॉंग्रेसचा झेंडा फडकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *