Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकर आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; राज ठाकरेंचीही भेट घेणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मार्च । कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आज राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान शिवतीर्थावर ही भेट होऊ शकते.

कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर रविंद्र धंगेकर सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर पुण्याचे खासदार गिरीष बापट, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

मात्र राज ठाकरे आणि मनसेशी धंगेकरांचं खास नातं आहे. धंगेकर काही काळ मनसेमध्ये सक्रिय होते. कसबा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकरांना मनसेची साथ मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरेंसोबतची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. (Political News)

रविंद्र धंगेकर आज मुंबई दौऱ्यावर आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेतील.

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप उद्या 9 मार्च रोजी विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर हे दोघेही राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही हजेरी लावणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *