महिलांसाठी आजपासून हेल्पलाइन; मन मोकळं करण्यासाठी ‘फेस टू फेस बी फ्रेंडिंग’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मार्च । मूल न होणे, सामाजिक दडपण, लज्जा, मनातली घुसमट अशा विविध कारणांमुळे महिलांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे 2020-21 या वर्षात महिलांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात 1.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात दररोज सरासरी 61 महिला आत्महत्या करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. त्यामुळे महिलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समॅरिटन्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने उद्याच्या (बुधवार) जागतिक महिला दिनानिमित्त च्या निमित्ताने ‘फेस टू फेस बी फ्रेंडिंग’ ही मोफत हेल्पलाइन सुरू होत आहे.

तीस वर्षांपासून मदतीचा हात

स्री-पुरुषांना मानसिक आधार देण्यासाठी समॅरिटन्सची हेल्पलाइन 1 मे 1993 पासून सुरू आहे. दरवर्षी या हेल्पलाइनवर सरासरी सहा हजार पह्न येतात. तणावाखाली असलेल्यांचे समुपदेशन, आत्महत्यांपासून प्रवृत्त आणि मानसिक आधार देण्याचे काम या हेल्पलाइनद्वारे होते.

सध्याचे महिलांमधील आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि महिलांना आधार देण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त उद्या बुधवारपासून फक्त महिलांसाठी ‘फेस टू फेस-बी फ्रेंडिंग’ ही हेल्पलाइन सुरू होत आहे. केवळ पह्नवर नाही तर समोरासमोर बसून महिलांना दादर पूर्व येथील संस्थेच्या पेंद्रात मन मोकळे करता येईल. या पेंद्रात 80 टक्के महिला स्वयंसेवक असल्याने महिलांना मोकळेपणाने व्यक्त होता येईल असा विश्वास ‘समॅरिटन्स’ला आहे.

हुंडय़ासाठी होणाऱया महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाणही आपल्या देशात अधिक आहे, पण अशी प्रकरणे दाबून टाकली जातात. त्यामुळे एखाद्या महिलेने हुंडय़ामुळे आत्महत्या केली याची नोंद होत नाही. एखाद्या महिलेने हुंडय़ामुळे आत्महत्या केली तर अपघाती मृत्यू अशी नोंद केली जाते. त्यामुळे संबंधित प्रकरण हुंडाबळी म्हणून नोंदवले जात नाही, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात येते.

आत्महत्यांची आकडेवारी
वर्ष 2019

एकूण आत्महत्या – 1,39,123

महिलांची संख्या – 41,493

वर्ष 2020

एकूण आत्महत्या – 1,53,052

महिलांची संख्या – 44,498

वर्ष 2021

एकूण आत्महत्या – 1,64,933

महिलांची संख्या -45,026

हेल्पलाइन ः 8422984528 /29/30 रोज दुपारी 4 ते रात्री 10

ईमेल : samaritans.helpline @gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *