कोरोना: या ठिकाणी एकाच दिवशी आढळले‎ कोरोनाचे पाच नवे रुग्ण‎

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । गेल्या २४ तासांत अमरावती जिल्ह्यात पाच नवे‎ कोरोनाबाधीत आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील‎ एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० झाली आहे. बाधा‎ पोहोचलेल्या नव्या रुग्णांमध्ये पार्वतीनगरातील‎ एकाच कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी व १७ वर्षीय‎ मुलाचा समावेश आहे. याशिवाय म्हाडा कॉलनीतील‎ ४२ वर्षीय पुरुष, सातुर्णा परिसरातील ५९ वर्षीय पुरुष‎ आणि आदर्शनगरमधील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश‎ आहे.

या पाच नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण‎ सक्रीय रुग्णांची संख्या १० झाली आहे. दुसरीकडे‎ जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीतांची‎ संख्या १ लाख ७ हजार १४१ झाली असून, त्यापैकी १‎ लाख ५ हजार ५०३ रुग्णांनी कोरोनावर विजय प्राप्त‎ करत सुटी घेतली आहे. या आजारामुळे आतापर्यंत १‎ हजार ५९६ जणांचा मृत्यू झाला असून, उपचारासाठी‎ अमरावतीत दाखल झालेल्या ३२ जणांनाही प्राण‎ गमवावे लागले. दरम्यान, जिल्ह्यात कोराेनाबाधीत‎ रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अलीकडे कमी असले‎ तरी नागरिकांनी गरज भासल्यास कोराना चाचणी‎ करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *