महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शिक सतीश कौशिक पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी एकच गर्दी केली होती. सतीश कौशिक बुधवारी मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. अनुमप खेर, अनिल कपूर आणि सतीश कौशिक हे तिघेही जिगरी मित्र म्हणून ओळखले जातात. कौशिक यांच्या निधनाची वार्ता सर्वांत आधी अनुपम खेर यांना समजली. त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित सगळ्यांना कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
https://www.instagram.com/viralbhayani/?utm_source=ig_embed&ig_rid=8b0b288f-30f6-4a4f-beaf-7648995e14c0
अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची जवळपास 45 वर्षे जुनी मैत्री होती. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अनुपम खेर हे ॲम्ब्युलन्समध्ये कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत.